Coronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम सज्ज

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाउन करण्यात आल्याने मुंबई – ठाण्यात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची मदत करण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची टीम सज्ज असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गरजू रुग्णांनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाद्वारे सुरू केलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

कॅन्सर, ब्रेन टुयमर, किडणी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, कॉकलियर इंप्लांट आदि नियोजित शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्यातील अनेक रुग्ण मुंबईत येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यातील डिस्चार्ज मिळालेल्या अनेक रुग्णांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी तसेच आवश्यक औषधउपचार मिळण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या अडचणीच्या काळात गरजू रुग्णांना गावी परतण्यासाठी वाहन व्यवस्था किंवा प्रसंगी मुंबईतील संत गाडगेबाबा धर्मशाळा मध्ये राहण्याची आणि जेवणाची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सहकार्याने गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा करण्यासाठी मदत केली जाणार आहे.

तरी,गरजू रुग्णांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनचे विश्वस्त अभिजित दरेकर यांनी केले आहे.

हेल्पलाईन नंबर – 

022 – 25322525 / 67 

( मंगेश चिवटे, कक्ष प्रमुख ) 

8907776002 

( माऊली धुळगंडे, वैद्यकीय सहाय्यक ) 

9423902525 

( निलेश देशमुख, वैद्यकीय सहाय्यक )

8275903030 

( स्वरूप काकडे, वैद्यकीय सहाय्यक) 

पत्ता- 1 

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ,

 एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय. 

मंगला हायस्कुल समोर, कोपरी, ठाणे ( पूर्व ) 

पत्ता – 2 

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, 

शिवसेना भवन, तळमजला, दादर ( पश्चिम )

Previous articleCoronavirus Updates : आज नविन २२ कोरोना बाधित रूग्ण आढळले;रुग्णांची संख्या २०३ वर पोहचली
Next articleभाजपा गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष : सामनातून टीका