३०० युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करा : सुधीर मुनगंटीवार

मुंबई नगरी टीम

मुंबई:कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. १४ एप्रिल पर्यंत देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे गरीब गरजू चिंतीत झाले आहे.या संकट समयी ३०० युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

कोरोना विषाणूच्या विरोधात जो लढा आपण सारे जण देत आहोत.या संकटाच्या काळात शासनातर्फे गरीब गरजू नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांना तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहे . या परिस्थितीत ३०० युनिट पर्यंत  विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी भावना व्यक्त करत याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

Previous articleभाजपा गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष : सामनातून टीका
Next articleबोरिवली दहिसर मध्ये दररोज ६ हजार गरजूंना मोफत भोजन