देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली.या फोन मागे कोणतेही राजकीय कारण नव्हते तर सध्या राज्यात असलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा चर्चा केली.

राज्यातील राजकीय घडामोडीच्या सहा महिन्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दुरध्वनीरून संभाषण झाले आहे.राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली आणि कोरोनाविरुद्धच्या या लढाईत भाजपा राज्य सरकारसोबत आहे, हे आश्वस्त केले. या संकटसमयी आम्ही सारे सोबत आहोत असेही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. राज्य सरकारला या समस्येला सामोरे जाण्यासाठी जे काही कठोर निर्णय घ्यावेसे वाटत असतील, ते त्यांनी जरूर घ्यावे.आम्ही भाजपा आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत.रेशन धान्यासंदर्भात नागरिकांच्या समस्या आणि कामगारांचे प्रश्न याबाबत यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना  अवगत केले.

Previous articleराज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये
Next articleऊसतोड कामगारांना मारहाण; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली नाराजी