मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाला नष्ट करण्यासाठी लॉकडाऊन पाळणे आवश्यक आहे.लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद असल्याने अनेकांचे दारूचे व्यसन सुटले आहे. “गावागावातील म्हणते पारू लॉकडाऊनमुळे माझ्या नवऱ्याची सुटली आहे दारू”त्यामुळे जर थोड्या महसुलासाठी लॉकडाऊनच्या काळात पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला तर कोट्यवधी लोकांच्या आनंदावर विरजण टाकणारा अन्यायकारक निर्णय असेल. त्यामुळे दारू ची दुकाने लॉकडाऊन च्या काळात सुरू नयेत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यासाठी न आठवले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत.
नुकतेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन पत्र लिहून लॉकडाऊनच्या काळात महसूलवाढीसाठी दारूची दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे.त्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी लॉक डाऊन च्या काळात दारूची दुकाने सुरू करण्यास तीव्र विरोध केला आहे. लॉकडाऊन मध्ये दारू कुठेही मिळत नाही त्यामुळे अनेकांचे दारू चे व्यसन सुटले आहे. त्यामुळे ज्यांचे दारूचे व्यसन सुटले त्यांच्या कुटुंबात आनंद आहे. आता पुन्हा लॉकडाऊनमध्ये जर दारूची दुकाने सुरू करण्याचा विचार राज्य शासनाने केला तर तो चुकिचा निर्णय ठरेल असे आठवले यांनी सांगितले.