प्रविण दरेकर यांनी केली परराज्यात पाठविणा-या मजूरांच्या व्यवस्थेची पाहणी

मुंबई नगरी टीम

मुंबई : बोरिवली येथून त्यांच्या गावी विशेष श्रमिक ट्रेनने जाणा-या मजूर, कामगार, श्रमिक वर्गांची विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज भेट घेतली व त्यांच्या परतीच्या प्रवासाच्या नियोजनाची पाहणी केली.

बोरिवली पूर्व येथील नॅन्सी कॉलनी एस.टी.डेपो येथे या मजूरांची एकत्रित येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन त्यांना बसच्या मार्फत रेल्वे स्थानकापर्यंत पोहचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक उपस्थित होते.बोरिवली परिसरात अडकलेल्या गुजराती नागरिकांना त्यांच्या गावी गुजरात येथे जाण्यासाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात येत आहे. सोशल डिस्टंन्सिंग तसेच सॅनिटाईझेशनचे सर्व नियम पाळूनच या बसमध्ये प्रवाश्यांना प्रवेश देण्यात येत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी गुजरात येथे जाणा-या बस च्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleउद्धव ठाकरे आमदार झाले ; ९ उमेदवारांची बिनविरोध निवड
Next articleकेंद्राचे पॅकेज म्हणजे जुन्या घोषणा, नियमित उपाययोजना आणि आश्वासनांची पुरचुंडी