चार दिवसात ६२ हजार ९१६ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात १५ मे  पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत गेल्या चार दिवसात ६२ हजार ९१६ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

पहिल्याच दिवशी म्हणजे १५ मे  रोजी ५ हजार ४३४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास आली. तर १६ मे  रोजी ८ हजार २६८ ग्राहकांना,१७  रोजी २० हजार ४८५ ग्राहकांना आणि १८ मे  रोजी २८ हजार ७२९ अशा एकूण पाच दिवसात ६२ हजार ९१६   ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास आली.मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री दुकानांपैकी ५ हजार २२१ मद्य विक्रीची दुकाने सुरू आहेत.राज्यात १५  पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे.मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापी  प्रणलीबाबत संकेत स्थळावर अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दुर करण्यात येत आहेत तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक,दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने ऑफलाईन  पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरीता शंभर रूपये किंवा आजीवन परवान्याकरीता १ हजार एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.

Previous articleभूमिपुत्रांनो पुढे या,महाराष्ट्र उभा करू : मुख्यमंत्री
Next articleराज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३५ हजार ५८ वर पोहचली