झोपलेले महाविकास आघाडी सरकार आता तरी जागे व्हा

मुंबई नगरी टीम

मुंबई : सुमारे तीन महिने राज्य सरकार कोरोना रोखण्यासस अपयशी ठरले आहे. दरदिवशी रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. आरोग्य व्यवस्थेत खाटा उपलब्ध नसल्याने तर कधी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे रुग्ण मोठ्या प्रमाणावर मृत्यमुखी पडत असल्याचे चिंताजनक चित्र निर्माण झाले आहे, आरोग्य खात्याच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप जनतेचे बळी जात आहेत.महाविकास आघाडीचे सरकार झोपले असून सरकारला जागे करण्याची आवश्यकता आहे.म्हणूनच जनतेचा संताप,उद्रेक आणि वेदना लोकशाही मार्गातून व्यक्त करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यभर मेरा आंगण मेरा रणांगण, महाराष्ट्र बचाव असे आंदोलन केले. सरकारने जागे आतातरी जागे होऊन कोरोनो नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यासाठी हे आंदोलन असल्याची स्पष्ट भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मांडली

विरोधी पक्ष नेते  दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज दहिसर पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर दरेकर यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर मेरा आंगण मेरा रणांगण हे आंदोलन करण्यात आले होते. या वेळी दरेकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी हाताला व तोंडाला काळे मास्क लावले होते व महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी काळे फलक, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करित हे आंदोलन केले. आंदोलनानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलनाता दरेकर यांनी सांगितले की, कोरोनाचा मुकाबला करण्यासठी केंद्र सरकारने आवश्यक मदत राज्य सरकारला दिली असून भविष्यात आणखी मदत देण्यात येणार आहे, तसेच राज्य सरकारला केंद्राने विविध सवलती दिल्या आहेत. तरी केरळ आणि अन्य राज्यांमध्ये स्वतंत्र  व्यवस्था म्हणून एक स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्यात आले. तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने अद्याप एकही रुपयाचे पॅकेज दिलेले नाही. आज राज्यातील शेतकरी, आंबा उत्पादक, मस्त्य व्यावसायिक सर्व उध्वस्त झाले आहेत. आज असंघटीत कामगारही उध्वस्त झाला आहे. नाभीक समाजातील सलून चालवणारा व बारा बलुतेदार यांना पोटाची विवंचना आहे. परंतु, सरकार यांच्यासाठी काहीही करत नाही.राज्य सरकारला विनंती आहे की यासाठी एक स्वतंत्र पॅकेज जाहीर करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा.त्यांचा आत्मविश्वास वाढवावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

राज्यात हजार-शेकडोच्या संख्येने रोज लोक मरत आहेत. त्यामुळे आम्ही जनतेच्या वेदना संवेदना थांबवू शकत नाही. त्यांना न्याय देण्याचे काम भारतीय जनता पक्ष करेल असा विश्वास या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करताना दरेकर यांनी सांगितले की, ज्या वेळेला आपण लोकांमध्ये जातो त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक धीर येतो. कारण आज लोक भयभीत अवस्थेत आहेत. ज्यावेळेला आपण यांची चौकशी करतो,डॉक्टरांना सूचना देतो, जे कोविड योद्धे आहेत त्यांच्या अडचणी समजून घेतो त्यामुळे विश्वासाचं वातावरण निर्माण होत आहे.त्यामुळे लोकांना दिलासा मिळतो. भाजपच्या तीन दिवसाच्या कोकण दौ-यामध्ये सरकार नावाची यंत्रणाच कार्यरत नसल्याचे विदारक चित्र आहे. परंतु, विरोधी पक्ष या नात्याने आम्ही जेव्हा तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. जनतेच्या अडचणी समजावून घेतल्या तेव्हा तेथील नागरिकामध्ये आत्मविश्वास आणि मनोबल  वाढले आहे असेही त्यांनी सांगितले.

कोरोना परिस्थिती ओढावल्या पासून कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी एक नियोजनबध्द योजना, कालबद्ध कार्यक्रम,फोर्स तयार करण्याची मागणी भाजपने केली होती. परंतु सरकारमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ आणि समन्वय नसल्याने आज कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. याकडे सरकार एका हतबलतेच्या अवस्थेतमधून पाहतय.जनताही हताश झाली आहे. आता काय होणार, कसं होणार ,कधी हा कोरोना आम्हाला घेऊन जाईल या भयभीत वातावरणात लोक आहेत.ज्यावेळी सरकार नावाची यंत्रणा अपयशी होते त्यावेळेला लोकांना आत्मविश्वास दिलासा, आणि धीर देणे विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. म्हणून यांच्या वेदना जनतेच्या दरबारात मांडणं हे आमचं काम आहे. या सर्व भावनेतून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत जनतेच्या भावना व्यक्त करण्यात येत असल्याचेही दरेकर यांनी नमूद केले.

Previous articleआमदारकीचा राजीनामा देवून गायब झालेल्या अजित पवारांचा ठावठिकाणा असा शोधला !
Next articleठाकरे सरकारचा रुग्णांना दिलासा : खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव