कोरोनावर मात केलेल्या जितेंद्र आव्हाडांचे भाजपशी दोन हात !

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती हताळण्यात राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला अपयश आल्याचे कारण देत भाजपच्यावतीने राज्यभर माझे अंगण  रणांगण अशी घोषणा देत महाराष्ट्र बचाव  आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावरून समाज माध्यमातून भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा जबरदस्त सामना सुरू असतानाच कोरोनावर मात केलेले राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे भाजपच्या विरोधात मैदानात उतरले असून,त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

कोरोनाचे संकट वाढत असताना राज्यातील महाविकास आघाडीच्या निष्क्रीयतेमुळे सामान्य माणूस हतबल झाला आहे, असे टीकास्त्र सोडत भाजपच्यावतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.समाज माध्यामांत तर महाविकास आघाडी आणि भाजप असा सामना रंगला आहे.भाजपचे हे आंदोलन साफ फसले असल्याची टीका सत्ताधा-यांकडून करण्यात आली असतानाच या आंदोलनात पक्षाच्या सुमारे अडीच लाख कार्यकर्त्यांच्यासोबतच त्यांचे कुटुंबिय आणि स्थानिक नागरिकांसह एकूण पावणे नऊ लाख लोक आंदोलनात सहभागी झाले असल्याचा दावा भाजपने केला असतानाच आता या लढाईत राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे.संकटात सापडलेल्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सावरण्यासाठी एकी महत्वाची असताना महाराष्ट्र द्रोही भाजपने आंदोलन करून दुहीची बीजे पेरली,जनता हे विसणार नाही आणि माफही करणार नाही..सत्तेचा हव्यास… असे ट्विट करून कोरोनावर मात केलेल्या आव्हाडांनी  भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Previous articleतळीरामांना खुशखबर : मुंबईत आजपासून घरपोच मद्यविक्री सुरू होणार
Next articleभाजपच्या बड्या नेत्याच्या माजी आमदार जावयाने राजकीय संन्यास घेतल्याने खळबळ