मुख्यमंत्री उद्या रायगड दौऱ्यावर ; मदत साहित्य आणि अनुदान वाटप करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या रविवारी १४ रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असून चौल, बोर्ली, मुरुड येथे चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदान वाटप केले जाणार आहे.

कोकणात आलेल्या निसर्ग वादळाच्या संकटानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुस-यांदा रायगडचा दौरा करणार आहेत.उद्या रविवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री मांडवा जेट्टी येथे पोहचतील.त्यानंतर चौल येथे जाऊन ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. ११ वाजता चौल मधील घरे, पिके नुकसानीची पाहणी करून नंतर त्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदील, इतर साहित्याचे वाटप करण्यात येईल. दुपारी १२ वाजता त्यांचे बोर्ली येथे आणि १२.३० वाजता मुरुड येथे आगमन होईल. दोन्ही ठिकाणी नुकसानीची पाहणी आणि मदत वाटप करण्यात येईल. मुरुड येथे त्यांची पत्रकार परिषद देखील होईल.दुपारी ३ वाजता मांडवा जेट्टी येथून बोटीने ते मुंबईकडे रवाना होतील.

Previous articleबर्थडे गर्ल अभिनेत्री दिशाने दिल्या आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Next articleकोकणातील मासेमारांसह शेतक-यांना कर्जमाफी द्या!