‘या’ निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये मिळणार ; सरकारचा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला आहे. कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये मिळणार आहेत.

या निर्णयाप्रमाणे शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला १ लाख २१ हजार रुपये देण्यात येतील. तातडीने हा शासन निर्णय काढल्याबद्धल सेंट्रल मार्डतर्फे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Previous articleदिल्लीच्या तक्तापुढे महाराष्ट्र कधीही झुकणार नाही : सुप्रिया सुळेंचा टोला
Next articleसिंधुदुर्गाचा किल्ला महाराजांनी बांधला,नाही तर काही जण म्हणतील मीच बांधला : मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला