Breaking : आजपासून शाळा सुरू होणार नाहीत

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारपासून  शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते.मात्र आज सोमवारपासून शाळा सुरू होणार नाहीत,असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याची माहिती शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दिली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यातरी शैक्षणिक वर्ष आजपासून म्हणजे सोमवारपासून सुरू करण्याचा मानस सरकारचा आहे.आजपासून राज्यातील शाळा सुरू होणार की नाही होणार यावरून पालक,विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड गोंधळाचे व संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला आहे. आज सोमवारपासून शाळा सुरू होणार नाहीत, असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याची माहिती शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दिली आहे.आज १५ जून शिक्षकांनी शाळेत जाण्याची गरज नाही. शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करावे. शाळा कधी सुरू करायच्या त्याचा निर्णय उद्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन केला जाईल. असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे. पाटील यांच्या मध्यस्तीनंतर शिक्षण आयुक्त रात्री उशिरापर्यंत याबद्दलचे आदेश काढणार आहेत अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष  मोरे यांनी दिली आहे.

Previous articleआतापर्यंत ५० हजार रुग्णांना डिस्चार्ज ; ५३ हजार रुग्णांवर उपचार सुरू
Next articleवाचा : राज्यातील कुठल्या भागातील  शाळा केव्हा सुरु होणार !