बाबा रामदेव यांच्या कोरोनाच्या औषधाला महाराष्ट्र सरकारचा दणका

मुंबई नगरी टीम

मुंबई : योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने दोनच दिवसांपूर्वी कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा करीत कोरोनावर ‘कोरोनिल’हे औषध पत्रकार परिषद घेऊन बाजारात आणले होते मात्र,पतंजलीच्या या औषधाच्या विक्रीवर निर्बंध केंद्र सरकारने निर्बंध घातल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही या औषध विक्रीवर बंदी आणली आहे.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे.

संपूर्ण जगात कोरोना विषाणूंनी विळखा घातला आहे.कोरोनावर औषध निर्मिती करण्यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरू असतानाच योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने दोनच दिवसांपूर्वी कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा करीत हे बाजारात आणले होते. केंद्राने यावर निर्बंध घातल्यानंतर आता या  औषधावर महाराष्ट्र सरकारनेही बंदी घातली आहे. महाराष्ट्रात कोरोनिल औषधांची विक्री करण्यास मनाई करण्यात येत आहे, असे ट्विट करीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बाबा रामदेव मोठा झटका बसला आहे.बाबा रामदेव यांनी तयार केलेल्या कोरोनिल या औषधावर बंदी घालण्यात येत आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायल बाबत कोणताही पुरावा नाही.जयपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या औषधाचं क्लिनिकल ट्रायल करण्यात आले होते की नाही,याचा शोध घेणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिलची विक्री होणार नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट केले आहे.आयुष मंत्रालयानेही बाबा रामदेव यांच्या या औषधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या औषधाच्या जाहिरातीवरही बंदी घातली आहे.

Previous articleदिलासा : आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ
Next articleमोदी सरकारविरोधात काँग्रेस करणार आंदोलन