आता एक क्लिक करा आणि मिळवा आपल्या आसपासच्या रुग्णवाहिकांची माहिती

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या रूग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.राज्यातील विशेषत: मुंबईतील कोरोना रूग्णांच्या ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवणारे भाजपचे माजी खासदार आणि उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यानुसार आता मुंबईकरांनाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनतेला आपल्या आसपासच्या रुग्णवाहिकेची आणि रुग्णसेवेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

भाजपचे माजी खासदार आणि उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून, यापुढे मुंबईकरांनाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनतेला आपल्या आसपासच्या रुग्णसेवेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.सोमैया यांनी केलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश राज्य सरकारकडून पाळण्यात आले आहेत.रुग्णवाहिकेची माहिती आणि रुग्णवाहिकेचे प्रत्येक जिल्ह्यातील दरही आता आरटीओच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले आहेत. सोमैया यांनी योग्य वेळी योग्य विषयासंदर्भात याचिका दाखल केल्याने न्यायाधीशांनीही सोमैया यांचे कौतुक केले आहे.लॉकडाऊन शिथील केल्यानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले असून सध्या मुंबईत ७८० नोंदणीकृत रुग्णवाहिकांपैकी ७०० रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे बीएमसीचे वकील अनिल साखरे यांनी सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.उच्च न्यायालयाने राज्याला दिलेली आणि अधोरेखित केलेली निवेदने रेकॉर्ड करुन स्वीकारली आहेत. राज्य सरकारने रुग्णवाहिकांची गरज असलेल्या रुग्णांवर प्रभावी उपाययोजना सुरू केल्याचेही सांगण्यात आले आहे.अशी माहिती सोमैया यांनी दिली आहे.

या सुनावणी दरम्यान यापुढे जर कोणत्याही खाजगी रुग्णवाहिका चालकाने जर नकार दिला तर त्यासंदर्भात तक्रारही दाखल करता येणार आहे. सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने हे नमूद केले आहे.

न्यायालयाने दिलेले निर्देश आणि राज्य सरकारने केलेली अंमलबजावणी पुढीलप्रमाण

  • आरटीओ वेबसाइटवरील डॅशबोर्ड कार्यरत
  • रुग्णवाहिका माहिती यादी उपलब्ध
  • रुग्णवाहिकेसंदर्भात तक्रार असल्यास संपर्क साधता येणार
  • आपल्या आसपासच्या रुग्णवाहिकेची आणि रुग्णसेवेची माहिती पुढील संकेतस्थळावर उपलब्ध
  •  https://transport.maharashtra.gov.in/Site/Common/ViewPdfList.aspx?Doctype=420db945-46cc-4acd-8586-8c16400a15db
Previous articleराज्यात कोरोनाचे ६५ हजार ८२९ ॲक्टीव्ह रुग्ण
Next articleराज्यात आज कोरोनाचे ५३१८ नवे रुग्ण ; १६७ रुग्णांचा मृत्यू