हसन मुश्रीफांची सवय म्हणजे “आ बैल मुझे मार” !

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्रात काही घडले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही म्हणायचे नसते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटीलांना यांना काही म्हणायचे नसते लगेचच हसन मुश्रीफांना म्हणायचे असते, निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड ! असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला आहे.

 महाविकास आघाडी सरकारने बदल्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यावर २०१४ ते २०१९ बदल्यांमध्ये घोटाळे झाले तर काय झोपा काढत होतात ?  असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले हे. इतक्या उशिरा जाग आल्यामुळे चौकशी करायची तर करा आधी २०२० बदल्यांमधील करा. तुम्ही काही केले नाही तर झोंबंत कशाला ? असा सवाल पाटील यांनी मुश्रीफ यांना केला आहे.ग्रामपंचायतींना प्रशासक, पी एम केअर, सुशांत प्रकरण सगळ्या विषयांमध्ये कोर्टाकडून थपडा खायचे असतील तर कोण काय करणार ? अशी टीकाही पाटील यांनी केली आहे.

मी जे म्हणतो ते महाराष्ट्राच्या डी.जी. नी म्हटले आहे. आस्थापना समितीच्या शिफारशींच्या बाहेर मी सह्या करणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे से सांगतानाच, सध्या कोल्हापूरात प्रशासन हतबल आहे. कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, रुग्णांना बेड मिळत नाही आहेत,स्वॅबच्या  रिपोर्ट मध्ये गोंधळ असा हाहाकार माजल्याच्या बातम्या रोज प्रसार माध्यमातून येत असताना त्याबाबत मुश्रीफ काहीही बोलत नाहीत पण वर घडणा-या गोष्टींवरुन जनतेचे लक्ष विचलीत व्हावे म्हणून अन्य गोष्टींवर बोलायचे हे म्हणजे गिरे तो भी ….. असे म्हणल्यातला प्रकार आहे अशा शब्दात पाटील यांनी मुश्रीफ यांना टोला लगावला आहे.

Previous articleसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
Next articleसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया … म्हणाले !