३७६ पोलीस अधिकारी,२४७४ पोलीस कोरोनाबाधित ;१५६ पोलिसांचा मृत्यू

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३७६ पोलीस अधिकारी व २४७४ पोलीसांना कोरोनाची लागण झाली असूनत्यांच्यावर उपचार सुरू आहेत.तर कोरोनामुळे राज्यात एकूण १५६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.कोरोनाबाधीतांमध्ये ठाणे,नवी मुंबई आणि मुंबईतील पोलिसांची संख्या जास्त आहे.

राज्यात कोरोनाचे संकट आल्यापासून राज्यातील जनतेच्या रक्षणासाठी रात्रदिवस झटणा-या ३७६ पोलीस अधिकारी व २४७४ पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे.तर एकूण १५६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यामध्ये मुंबईतील ६२ पोलीस व ७ अधिकारी अशा एकूण ६९,नवी मुंबई २, ठाणे शहर १७,पुणे शहर ३,नागपूर शहर ५,नाशिक शहर ३,अमरावती शहर १,औरंगाबाद शहर ३,सोलापूर शहर ३, ठाणे ग्रामीण ४ व १ अधिकारी,पालघर २ व १ अधिकारी,रायगड ३,पुणे ग्रामीण २,सांगली १,सातारा ३,कोल्हापूर १,सोलापूर ग्रामीण १, नाशिक ग्रामीण ५,जळगाव  २,अहमदनगर ३,उस्मानाबाद १,बीड १,जालना १,बुलढाणा १,चंद्रपूर १,मुंबई रेल्वे ४,पुणे रेल्वे अधिकारी१,औरंगाबाद रेल्वे १,एसआरपीएफ 3 जालना-१, एसआरपीएफ ९ -१, एसआरपीए ११ नवी मुंबई १, एसआरपीएफ ४ नागपूर -१अधिकारी,एसआरपीएफ ४ -१ अधिकारी,ए.टी.एस. १,पीटीस मरोळ अधिकारी १,एसआयडी मुंबई २ व १अधिका-यांचा समावेश आहे.

राज्यात कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख ४५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.राज्यात  लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे २२ मार्च ते ३० ऑगस्ट पर्यंत  कलम १८८ नुसार २,४५,९२९   गुन्हे नोंद झाले असून ३४,१८२ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी  २३ कोटी ४७ लाख ०७  हजार ५६४ रुपये दंड आकारण्यात आला.तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ८ लाख १६  हजार ७९८ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले.दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३४० घटना घडल्या. त्यात ८९१ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ८२९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती देशमुख यांनी दिली.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,१०६ वाहने जप्त करण्यात आली.

Previous articleई-पास रद्द केल्यानंतर आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी; उद्यापासून बुकिंग सुरू
Next articleप्रवीण दरेकरांनी केला मालाड मधील रुग्णालयाच्या राक्षसी लुटमारीचा पर्दाफाश