अधिवेशनाला वादळी सुरूवात : सहा आमदारांसह ४७ अधिकारी करोनाबाधित

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या सावटाखाली सुरू झालेल्या दोन दिवसीय राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरूवात झाली.मात्र अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी आमदार आणि अधिकारी,कर्मचा-यांच्या करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत ६ आमदार आणि ४७ अधिकारी,कर्मचारी आणि पोलिस कोरोनाबाधीत आढळल्याने खळबळ माजली आहे.या कोरोना चाचणीचा अहवाल न मिळाल्याने अनेक आमदारांना आणि अधिका-यांना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मध्ये हस्तक्षेप केल्याने आमदार आणि अधिका-यांना प्रवेश देण्यात आला.

पुरवणी मागण्यासह अनेक महत्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे.मात्र,अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून मंत्री,अधिकारी,कर्मचारी आणि पत्रकारांच्या अशा एकूण २२०० कोरोना चाचण्या करण्यात आल्या.शनिवार आणि रविवारी करण्यात आलेल्या या चाचण्यांमध्ये ६ आमदारांसह ४७ मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी आणि काही पोलिस करोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.शनिवारी करण्यात आलेल्या चाचण्यांचा अहवाल काल म्हणजेच रविवारी आल्याने ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे अशांना आज विधानभवनात प्रवेश देण्यात आला तर रविवारी ज्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यांचा अहवाल प्राप्त न झाल्याने अशा आमदार आणि अधिकारी-कर्मचारी यांना प्रवेशासाठी प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले होते.काही आमदारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.या सर्व प्रकारामुळे काही वेळ विधानभनवाच्या प्रवेशद्वारावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.हा प्रकार सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या ठिकाणी आगमन झाले असता अनेक आमदारांनी या प्रकार त्यांच्या कानी घातला. शेवटी अजित पवार यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या आमदारांना विधानभनवात प्रवेश देण्यात आला.

अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान प्रवेशद्वारावरच मोजण्यात येणार आहे. विधानभवनात जागोजागी र्निजतुकीकरण यंत्रे बसवण्यात आली आहेत. अंतर नियमांचे पालन केले जावे, यासाठी सर्वत्र सुरक्षारक्षक तैनात राहणार आहेत.एका बाकावर एकाच आमदाराला बसण्याची सोय करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चहापानाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला.विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थित हे अधिवेशन सुरू आहे.अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी मराठवाड्यातील काही आमदारांनी वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विधानभनवाच्या पाय-यावर आंदोलन केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानभनवात आगमन झाले असता या आमदारांनी या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले.मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला.

कोरोनाबाधित झालेले लोकप्रतिनिधी ( या मध्ये अनेकांनी कोरोनावर मात केली आहे )

विधानसभा अध्यक्ष : नाना पटोले

मकरंद पाटील – राष्ट्रवादी

किशोर जोरगेवार – अपक्ष

ऋतुराज पाटील – काँग्रेस

प्रकाश सुर्वे – शिवसेना

पंकज भोयर – भाजप

माणिकराव कोकाटे – राष्ट्रवादी

मुक्ता टिळक – भाजप

वैभव नाईक शिवसेना

सुनील टिंगरे – राष्ट्रवादी

किशोर पाटील – शिवसेना

यशवंत माने – राष्ट्रवादी

मेघना बोर्डीकर – भाजप

सुरेश खाडे – भाजप

सुधीर गाडगीळ – भाजप

चंद्रकांत जाधव – काँग्रेस

रवी राणा – अपक्ष

अतुल बेनके – राष्ट्रवादी

प्रकाश आवाडे – अपक्ष

अभिमन्यू पवार – भाजप

माधव जळगावकर – काँग्रेस

कालिदास कोलंबकर – भाजप

महेश लांडगे – भाजप

मोहन हंबरडे – काँग्रेस

अमरनाथ राजूरकर – काँग्रेस

मंगेश चव्हाण – भाजप

गीता जैन – अपक्ष

सरोज अहिरे -राष्ट्रवादी ( होम क्वारंटाईन )

मंत्री

जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी

असलं शेख – काँग्रेस

अशोक चव्हाण – काँग्रेस

धनंजय मुंडे – राष्ट्रवादी

संजय बनसोडे – राष्ट्रवादी

अब्दुल सत्तर – शिवसेना

सुनील केदार – काँग्रेस

बाळासाहेब पाटील – राष्ट्रवादी

विधान परिषद सदस्य

सदाभाऊ खोत – भाजप

सुजित सिंग ठाकूर – भाजप

गिरीश व्यास – भाजप

नरेंद्र दराडे -भाजप

Previous articleमी माझ्या विधानावर ठाम,कितीही वेळा तुरुंगात जायला तयार !
Next articleग्रामपंचायत विधेयकावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने ; विरोधकांचा सभात्याग