शिवसेनेचा भाजपला दणका;भाजप समर्थक अपक्ष आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी नंतर आता शिवसेनेने भाजपचा दणका दिला आहे.मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आणि भाजपला समर्थन दिलेल्या आमदार गीता जैन यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शनिवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश करून काही तास उलटत नाही तोपर्यंत शिवसेनेने भाजपला दुसरा दणका दिला आहे. मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आणि भाजपला समर्थन दिलेल्या आमदार गीता जैन यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.मातोश्री निवासस्थानी आज त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पश्रप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते.गतवर्षीच्या  विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव करत गीता जैन या अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.भाजपातून बंडखोरी करीत  गीता जैन यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असली तरी त्यांनी नंतर भाजप पक्षालाचा पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. मात्र गेल्या वर्षभरात पक्षातील स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी गीता जैन यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्या काहीशा नाराज होत्या.या नाराजीमुळेच त्यांनी आज शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश करताच मिरा-भाईंदरमध्ये पुढचा महापौर हा सेनेचाच,असेल असा एल्गार केला आहे.

यावेळी बोलताना गीता जैन म्हणाल्या, माझ्या प्रवेशामुळे भाजपला धोका आहे की नाही ते त्यांनी ठरवावे. महापालिकेच्या विकासकामाच्या आश्वासनामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच मिरा-भाईंदरमधील भाजपचे अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. वेळ आल्यावर ते शिवसेनेत प्रवेश करतील, असा खुलासाही त्यांनी केला. दरम्यान, भाजपला उत्तर महाराष्ट्रानंतर आता मिरा-भाईंदरच्या महापालिकेतही दणका बसण्याची शक्यता आहे.

Previous articleराष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडला;माजी मंत्र्याचा आरोप
Next article“मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे”: पंकजाताईंचा पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम