मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकारने आज चार वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून,अरविंद कुमार यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव व विशेष कार्य अधिकारी महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई या पदावर करण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सचिव सीमा व्यास यांची नियुक्ती प्रधान सचिव व विशेष चौकशी अधिकारी १ सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.ओ. पी. गुप्ता यांची नेमणूक प्रधान सचिव,उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.