राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार ? शिक्षणमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी,गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे.शिक्षण मंत्री गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी आँनलाईन शिक्षण पध्दती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Previous articleसीएसटीच्या ‘त्या’च पेटीवर बसले धनंजय मुंडे;ज्या पेटीवर बसले होते स्व.गोपीनाथराव मुंडे!
Next articleठाकरे सरकारमधील तिन्ही पक्ष सत्तेसाठी लाचार : प्रविण दरेकर