वीज बिल थकबाकीच्या चौकशीवरून देवेंद्र फडणवीसांनी दिले सरकारला आव्हान !

मुंबई नगरी टीम

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या सरकारच्या काळात उर्जा विभागाने उत्तम काम केले आहे. त्यामुळे तुमच्या सरकारने आणि आम्ही काय केले हे समोरासमोर येऊन स्पष्ट करुयात. असे आव्हान देवेंद फडणवीस यांनी दिले आहे. आज नागपुरात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडवीस यांनी आज शुक्रवारपासून नागपूर पदवीधर मतरासंघाच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकार तसेच शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. आमच्या सरकारच्या काळात उर्जा विभागाने उत्तम काम केले आहे. आमच्या काळात थकबाकी झाली असेल, म्हणजेच आम्ही गरिबांना सवलत दिली आहे. त्यामुळे तुमच्या आणि आमच्या सरकारने काय केले हे एकदा स्पष्टच करुयात, असे त्यांनी म्हटले. याशिवाय त्यांनी आपल्या सरकारमध्ये महावितरण डबघाईला आल्याचा आरोपही फेटाळून लावला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिल सवलतीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वीज बिल थकबाकीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंबई महापालिकेवर भेसळयुक्त भगवा कधीच फडकणार नाही,असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागले होते. यावरही उत्तर देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणा-यांसोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. मग आता भगवा तुमचा राहीलेला नाही, त्यात भेसळ झाली असल्याची झळझळीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासह नागपूर पदवीधर मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास फडणवीसांनी यावेळ व्यक्त केला. नागपूर भाजप आणि नितीन गडकरींचा बालेकिल्ला आहे. महाविकास आघाडीने पदवीधऱ आणि शिकक्षकांची निराशा केली आहे. त्यामुळे नागपूर मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व राहील, असे फडणवीस म्हणाले.

Previous articleठाकरे सरकारचा भाजपला शॉक ; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
Next article‘जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे’ : राज ठाकरे