भिवंडीच्या उपमहापौरांसह १८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

मुंबई नगरी टीम

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भिवंडी महापालिकेचे उपमहापौर इम्रान अली मोहम्मद खान यांच्यासह १८ नगरसेवक,मिरा-भाईंदर महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सावळे,माजी विरोधी पक्षनेते लियाकत शेख यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

भिवंडीसह मिरा-भाईंदर आणि औरंगाबाद सिल्लोडचे ठगन भागवत,अमरावतीमधील डॉ.मोईन देशमुख, निखत देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.आगामी निवडणुकीत या मान्यवरांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीच उपयोग होईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.तसेच दौंड तालुक्यातील भाजप व रासपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व माजी आमदार रमेश थोरात यांच्या पुढाकाराने दौंड येथील तात्यासाहेब ताम्हाणे,पोपटराव बोराटे, चंद्रकांत कारंडे, दादासो भिसे, जनार्दन सोनवणे, प्रकाश टिळेकर, अशोकराव बोराटे, संतोष जाधव, शिवराम ताम्हाणे, आतिष बोराटे, सतिश खुने, बिभिषण खुने, संतोष ढोरले यांनी राष्ट्रवादीच प्रवेश केला.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते.

Previous articleमेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु : एकनाथ शिंदे
Next articleदिलासा : मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देणार