आता एमपीएसीची परीक्षा केवळ सहा वेळाच देता येणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वेगवेगळ्या पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात.या परीक्षेला किती वेळा बसावे याची मर्यादा नव्हती मात्र आता यापुढे खुला वर्गाच्या परीक्षार्थींना केवळ सहा वेळाच अशा परीक्षांना बसता येणार आहे.याची घोषणा आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात आली आहे.याची अंमलबजावणी नव्या वर्षापासून करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षासंदर्भात म्हत्वाचा निर्णय घेतला असून,यापूर्वी अशा स्पर्धा परीक्षेस बसण्यास मर्यादा नव्हती मात्र आता यावर मर्यादा आणण्यात आली आहे.या निर्णयामुळे यापुढे खुला (अराखीव) वर्गातील उमेदवारांस केवळ सहा वेळा अशा परीक्षा देता येणार आहे.मागास प्रवर्गातील उमेदवारांस कमाल नऊ वेळा अशा परीक्षा देता येतील तर अनुसुचित जमाती व अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही.उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास,ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल.एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास, त्याची ती संधी समजली जाणार आहे.उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती ही संधी म्हणून गणली जाईल.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या निर्णयाची अंमबजावणी २०२१ मध्ये प्रसिध्द होणा-या जाहिरातीस अनुसरुन आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येणार आहे.

Previous articleग्रामपंचायत निवडणूक: जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज ३० डिसेंबरला ऑनलाईनसह ऑफलाईन स्वीकारणार
Next articleराज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा : प्रवीण दरेकरांचा घणाघात