शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची शाळेला भेट

मुंबई नगरी टीम

पुणे : कोरोनाच्या संकटानंतर आज शाळेची घंटा वाजली असून राज्यातील ५ वी ते ५ वीचे वर्ग सुरु झाले आहेत.विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेल्या काही शाळांमध्ये आज शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रतिक्रीया जाणुन घेतली.

आजपासून राज्यांत ५ ते ५ वी चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील,ठाणे तसेच नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील शाळा सोडून राज्यातील सर्व शाळा सुरु झाल्या आहेत.त्यामुळे आज पहिल्याच दिवशी प्रा. गायकवाड यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यांतील म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देउन मुलांच्या व शिक्षकांच्या शाळा सुरु झाल्याबद्द्ल प्रतिक्रिया जाणून घेतल्या.कोरोनासंदर्भातील सर्व खबरदारी घेऊन सुरु करण्यात आलेल्या शाळांपैकी आज सकाळी पुणे महानगरपालिका हद्दीतील आपटे प्रशाळा व मॅार्डन शाळा या दोन खाजगी व हुतात्मा शिरीष कुमार या मनपा च्या शाळेतील ९- १० इयत्तेच्या शाळेला त्यांनी भेट दिली.

त्याच बरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडी या शाळेला देखील त्यांनी भेट दिली. शाळांबाबत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तसेच तिथे उपस्थित असलेल्या पालकांशी शाळा सुरु केल्याबाबत संवाद साधला.शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. जे मुल आजारी आहे, किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये असे आवाहन प्रा. गायकवाड यांनी केले आहे.

Previous articleआशिष शेलार तेव्हा तुम्ही झोपले होता का ? राष्ट्रवादीकडून सडेतोड उत्तर
Next articleविरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या ‘लेखाजोखा’ या पुस्तकाचे उद्या प्रकाशन