विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या ‘लेखाजोखा’ या पुस्तकाचे उद्या प्रकाशन

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी त्यांच्या विरोधी पक्ष नेते म्हणून वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा घेणा-या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या गुरुवार २८ जानेवारी २०२१ रोजी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

नरिमन पॉईंट येथील यशवंत चव्हाण केंद्र येथे सायंकाळी ४ वाजता पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रविण दरेकर यांच्या विधान परिषद विरोधी पक्ष नेता म्हणून वर्षपूर्तीचा आलेख ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकात मांडण्यात आला आहे. कोरोना संकट असो की नागरिकांच्या समस्या विरोधी पक्ष नेता म्हणून प्रविण दरेकर यांनी राज्यामध्ये कशा पध्दतीने समाजासाठी काम केले. निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेला कोकणची जनता असो वा अतिवृष्टीमध्ये सापडेलेला शेतकरी यांच्या समस्या दरेकर यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटी देऊन जाणून घेतल्या. राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था व अन्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दरेकर यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरिब,मध्यमवर्गीय यांच्या विविध समस्या व प्रश्नांना विधापरिषेदमध्ये वाचा फोडली व त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केला. दरेकर यांच्या या कार्याचा आढावा ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकात मांडण्यात आला आहे.

पुस्तक प्रकाशन सोहळाच्या निमित्ताने लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत “ महाराष्ट्राचे लोक संगीत” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प. पू सदगुरू दादा महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन,विधानसभेचे मुख्य प्रतोद व आमदार आशिष शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.विधिमंडळ गट उपनेते आमदार विजय़ (भाई) गिरकर, विधान परिषद प्रतोद व आमदार सुरजितसिंह ठाकुर,आमदार प्रसाद लाड हे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक आहेत.

Previous articleशाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची शाळेला भेट
Next articleकर्मचाऱ्यांनो ..संपात सहभागी झाल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई