उध्दव ठाकरे यांनी स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी !

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला आहे.राणे यांनी ट्विट करीत,मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे,सरकारी पैशातून नाही.श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

मालवण तालुक्यातील मसुरे-आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजना,मालोंड-मालडी कोल्हापूरी पाटबंधारे योजना आणि कणकवली तालुक्यातील कुंभवडे लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,अनेकजण स्वतःसाठी काही ना काही मागत असतात,पण कोकणातील लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक,विश्वस्त म्हणून काम करत आहेत.स्वतःसाठी काही न मागता जनतेसाठी रुग्णालय आणि इतर गोष्टी मागत असल्याचा मला आनंद आहे.मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून पलटवार केला आहे.मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे,सरकारी पैशातून नाही.श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी असे प्रत्युत्तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे ?

कोकणात पाऊस भरपूर पडतो, पूर येतो, अतिवृष्टी होते, पण ते संपल्यानंतर सगळ पाणी वाहून समुद्राला मिळते, अनेक ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर उरलेले सगळे वर्ष कोरडे जाते. मग अनेक खलबत होतात,योजना पुढे येतात.पण आज अरविंद सावंत, विनायक राऊत यांनी या तीन योजना पुढे आणल्या.त्या कागदावर न ठेवता प्रत्यक्षात येण्यासाठी पाठपुरावा केला. योजनांसाठी पाठपुरावा करून घेता, याला अधिक महत्व आहे.राज्यात अनेक धऱण, पाटबंधारे झाले,पण अजून काही कामे बाकी आहेत. आता आपण गोसीखुर्द धरणाच्या कामाला गती दिली आहे.आज या तीन पाटबंधारे कामांचे आपण भूमिपूजन ऑनलाईन करतो आहोत. पण, धरणाच्या उद्घाटनाला मी तिथे प्रत्यक्ष येईल हे माझे तुम्हाला वचन आहे. अनेकजण स्वतःसाठी काही ना काही मागत असतात,पण कोकणातील लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक, विश्वस्त म्हणून काम करत आहेत.स्वतःसाठी काही न मागता जनतेसाठी रुग्णालय आणि इतर गोष्टी मागत असल्याचा मला आनंद असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Previous articleसरकारने कायदा व सुव्यवस्था ‘भगवान भरोसे’ सोडलीय का ? दरेकरांचा सवाल
Next articleकोकणचा विकास मार्गी लावणार म्हणजे लावणारच : मुख्यमंत्री ठाकरे