आमच्यामुळे हे सत्तेत आले,मांडीला मांडी लावून बसले…काँग्रेस,राष्ट्रवादीला सेना आमदारांचा इशारा

मुंबई नगरी टीम

सोलापूर । ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी बघितली होती का ? केवळ आमच्या पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे त्यांच्या निर्णयामुळे तुम्हाला आज सत्तेचे तोंड पाहायला मिळत आहे, त्याची फळं चाखालयला मिळत आहेत.ज्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं त्याच पक्षावरती तुम्ही एवढा अन्याय करतात, आम्ही का सहन करायचं ? असा सवाल करतानाच,आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय,असा इशारा शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी दिलाय.

सोलापूर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवा सेना कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी काँग्रेस,राष्ट्रवादीवर उघडउघड नाराजी व्यक्त केली.महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत आहे,अशा शब्दांत आमदार सावंत यांनी सरकारला आहेर दिला आहे.आज आमचा निधी,आम्हाला जे अधिकारी हवेत ते मिळत नाहीत असे खडेबोलही त्यांनी यावेळी सुनावले.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आमची प्रचंड नाराजी आहे असेही त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवले.ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी बघितली होती का ? केवळ आमच्या पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे त्यांच्या निर्णयामुळे तुम्हाला आज सत्तेचे तोंड पाहायला मिळत आहे, त्याची फळे चाखालयला मिळत आहेत. ज्यांनी तुम्हाला सत्तेत बसवले त्याच पक्षावरती तुम्ही एवढा अन्याय करतात, आम्ही का सहन करायचं ?” असेही आमदार सावंत म्हणाले.आम्हाला सत्तेत बसायची सवय नाही,भाजपच्या काळातही अन्याय होत होता आणि आताही तेच होत आहे, अशी व्यथा त्यांनी सोलापुरात युवा सेना मेळाव्यात बोलताना व्यक्त केली.

Previous articleसमर्पित आयोग ओबीसी जनगणना करणार नाही; आकडेवारी वेगळी आल्यास करायचे काय ?
Next articleहिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो ?