…तर राज्यात शिवसेना भाजप एकत्र येईल ! शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडीला सत्तेत येवून नुकतीच दोन वर्षे पुर्ण झाली आहेत.तर दुसरीकडे राज्यात लवकरच भाजपची सत्ता येईल असा विश्वास भाजपचे नेते व्यक्त करीत असतानाच शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नवी दिल्लीत एक नवाच दावा केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवल्यास शिवसेना आणि भाजप एकत्र येतील,असा दावा सत्तार यांनी केला.

शिवसेना नेते आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सिल्लोड – सोयगाव मतदार संघासह जिल्ह्यातील रस्ते विकासासंदर्भात दिल्ली येथे केंद्रीय सडक परिवहन राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.या भेटीनंतर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वरील दावा केला. नितिन गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवल्यास शिवसेना आणि भाजप एकत्र येतील, असा दावा सत्तार यांनी केला आहे.गडकरी यांनी महाराष्ट्रात लक्ष घातले तर शिवसेना भाजप एकत्र येईल.शिवसेना आणि भाजप यांना एकत्र आणण्याची चावी गडकरी यांच्याकडे आहे, असे सत्तार यांनी यावेळी म्हटले आहे.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील कारभार मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यावा असे वक्तव्य केले होते. तर पक्षाचे नेतृत्व रश्मी ठाकरे यांच्याकडे दिले तरी कोणाची हरकत नसेल, असेही सत्तार यावेळी म्हणाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संबंध चांगले आहेत.त्यामुळे गडकरी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला तर राज्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येईल असेही सत्तार यांनी सप्ष्ट केले.

Previous articleमोठा निर्णय । मुंबई,नवी मुंबई व ठाण्यातील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद
Next articleबापरे ! १३ मंत्र्यांसह ७० आमदारांना कोरोनाची लागण; मंत्रीमंडळाची बैठक रद्द