‘पिंगा फेम’ गायिका वैशाली माडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई नगरी टीम

पुणे । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक बडे कलाकार राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसत आहेत.आता पिंगा फेम सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.पक्षाच्या विस्तारासाठी राष्ट्रवादीने अशा कलाकारांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे या येत्या ३१ मार्चला मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे.एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते चित्रपट सृष्टीतील नामवंत गायिका अशी ओळख वैशाली माडे यांची आहे.मराठी बिग बॉस या कार्यक्रमामुळे वैशाली माडे प्रचंड चर्चेत आहेत.

Previous articleशरद पवार आणि अमित शहांची गुप्त भेट झालीच नाही,अफवांची धुळवड थांबवा!
Next articleपंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत भगीरथ भालके विरूद्ध समाधान औताडे सामना रंगणार