शरद पवार आणि अमित शहांची गुप्त भेट झालीच नाही,अफवांची धुळवड थांबवा!

मुंबई नगरी टीम

मुंबई । पवार-शहांची भेट झाली तर चूक काय ? भेट झाली तर होऊ द्या. कामानिमित्त भेट झाली असेल तर चूक काय ? असा सवाल करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळातच आपली प्रतिक्रिया बदलत पवार-शहा यांची भेट झालीच नाही असा दावा करीत अफवांची धुळवड थांबवा.हाती काहीच लागणार नाही,असे राऊत यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित भेटीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच,शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की,पवार-शहांची भेट झाली तर चूक काय ? भेट झाली तर होऊ द्या.कामानिमित्त भेट झाली असेल तर चूक काय ?. त्यानंतर राऊत यांनी अर्ध्या तासातच राऊत यांनी नवं ट्विट करून या भेटीबद्दल मोठं वक्तव्य केले आहे.त्यांनी ट्विट करून अशी भेटच झाली नसल्याचा दावा केला आहे.पवार-शहा यांची गुप्त भेट झालीच नाही.मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा.अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

Previous articleभाजपचा गौप्यस्फोट : राष्ट्रवादी आणि भाजपचं ठरलं तर,पहाटेचा शपथविधी झाल्यावर कळेल !
Next article‘पिंगा फेम’ गायिका वैशाली माडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार