मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे बारावीच्या परीक्षांबाबत योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे यावर्षी बारावीची मुले गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्याच्या शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad जी, आपणास विनंती आहे की कृपया संबंधित घटकांशी चर्चा करुन याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा. @CMOMaharashtra
— Supriya Sule (@supriya_sule) April 21, 2021
राज्यातील कोरोनाची परिस्थिती बिकट झाल्याने राज्य सरकारने राज्यातील दहावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र हा निर्णय घेत असतानाच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी परीक्षा महत्त्वाची असते,त्यामुळे बारावीची परीक्षा होणार हे निश्चित आहे.मे महिन्याच्या अखेरीस बारावीची परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितल्याने नेमक्या या परीक्षा होणार तरी कधी हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री ठाकरे आणि शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याकडे दहावी प्रमाणेच बारावीच्या परीक्षांबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी बारावीच्या परीक्षांबाबत मुले,पालक व शिक्षकांमध्ये अद्यापही संभ्रमावस्था आहे.मुलांना वर्षभर शाळेत जाता आले नाही.याशिवाय सर्वच मुलांना ऑनलाईन शिक्षण घेता आले याबाबतही काही ठोस सांगता येत नाही.
त्यामुळे यावर्षी बारावीची मुले गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्याच्या शिक्षणमंत्री गायकवाड, आपणास विनंती आहे की कृपया संबंधित घटकांशी चर्चा करुन याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा असे ट्विट खा. सुळे यांनी केले आहे.त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये दहावी प्रमाणेच बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय होतो का ? याकडे विद्यार्थी ,पालक व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.