जाणून घ्या : लॉकडाऊनमध्ये कोणाला एसटीने प्रवास करता येणार !

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात आजपासून कडक लॉकडाऊनची सुरूवात झाली आहे.यासंदर्भात राज्य सरकारने नियमावली जाहीर केली असली तरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम असल्याचे चित्र आहे.त्यामुळे या लॉकडाऊन मध्ये एसटीतून आणि मुंबईतील लोकलमधून कोणाला प्रवासाची मुभा आहे.याबाबत जाणून घेवूया.राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार पुढील व्यक्तींना एसटी आणि लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

एसटीमधून खालील व्यक्तींनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करू शकतात
सरकारी कर्मचारी
सरकारी,खासगी रुग्णालयातील डॉक्टर
प्रयोगशाळेतील कर्मचारी आणि पॅरामेडिकल मधील कर्मचारी
रुग्णालय आणि वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी
कोणतीही व्यक्ती ज्याला वैद्यकीय उपचाराची गरज आहे
अपंग व्यक्ती आणि त्यांच्या मदतीला एक अतिरिक्त व्यक्ती प्रवास करू शकतो

लोकलमधून खालील व्यक्तींनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे

वैद्यकीय उपचाराची गरज करणारा व्यक्ती
राज्य सरकारी आणि केंद्र सरकारी कर्मचारी
रेल्वेचे कर्मचारी
जिल्हाधिकारी कार्यालयाती कर्मचारी
मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी
नवी मुंबई,पालघर, वसई विरार, कल्याण, मिरा भाईंदर महानगरपालिकेतील कर्मचारी
मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस
बेस्ट कर्मचारी
नवी मुबंई वसई विरार, कल्याण वाहतूक कर्मचारी
आयकर विभाग, कस्टम,जीएसटी, पोर्ट स्ट्रस्ट कर्मचारी
राजभवनामध्ये काम करणारे कर्मचारी
सरकारी,खासगी रुग्णालयांचे सर्व कर्मचारी
पॅथॉलॉजी, फार्माचे सर्व कर्मचारी
दिव्यांग व्यक्ती असलेले प्रवास करू शकतात

बसगाड्या वगळता इतर खासगी प्रवासीवाहतूक केवळ आपत्कालीन सेवेसाठी वा वैध कारणांसाठी वापरता येईल आणि त्यासाठी चालक अधिक प्रवासी आसनक्षमतेच्या पन्नास टक्के ही कमाल मर्यादा राहील. या प्रवासात आंतर-जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासीवाहतूक अपेक्षित नाही तर प्रवाशांच्या निवासस्थानाच्या शहरापुरती मर्यादित राहील. जीवनावश्यक सेवेची पूर्तता किंवा वैद्कीय आपत्कालीन प्रसंग वा अंत्यसंस्कार आणि कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असणे यासारख्या परिस्थितीत आंतरजिल्हा आंतरशहर प्रवासाला परवानगी दिली जाईल.या आदेशांचा भंग करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

खासगी प्रवासी बसगाड्या आसनक्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी घेऊन जाऊ शकतील पण उभे राहून प्रवास करणारे प्रवासी घ्यायला परवानगी नाही.आंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवास करण्यासाठी खासगी बसगाड्यांसाठी खालील नियंत्रणे राहतील.बससेवा देणाऱ्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा आणि त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी. गरज भासल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यात बदल सुचवू शकतील.सर्व थांब्यांवर उतरणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस गृहविलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल आणि हे शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे.

Previous articleदहावी प्रमाणेच बारावीच्या परीक्षेबाबत तातडीने योग्य निर्णय घ्या : सुप्रिया सुळेंची मागणी
Next articleविद्यार्थ्यांना दिलासा : राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार