लग्न समारंभ फक्त दोन तासात उरका,अन्यथा ५० हजारांचा दंड

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने २२ एप्रिल संध्याकाळी ८ वाजल्यापासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत.त्यानुसार येत्या १ मे पर्यंत लग्न समारंभ हा केवळ दोन तासात उरकायचा आहे.अन्यथा ५० हजारांचा दंड आकारला जाणार आहे.

राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने येत्या १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत.आता या दरम्यान आपणास विवाह समारंभ उरकायचा असेल तर सर्व विधी हे केवळ दोन तासाच उरकावे लागणार आहेत.विवाहसमारंभ साजरे करताना ते एकच समारंभ म्हणून एकाच हॉलमधे करावे लागणार आहेत.शिवाय लग्न सोहळ्याचे सर्व कार्यक्रम हे केवळ दोन तासात पूर्ण करावे लागणार आहेत.हा सोहळा पार पाडताना जास्तीत जास्ती २५ व्यक्तीना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करत असलेल्या कुटुंबांना पन्नास हजार रुपयांचा दंड आकारला जाईल आणि संबंधित हॉल किंवा समारंभस्थळ कोरोनाची आपत्ती आहे तोपर्यंत बंद केले जाणार आहे.

Previous articleलॉकडाऊन:आंतरजिल्हा प्रवासावरबंदी,उपचारासाठी अंत्यसंस्कारासाठी प्रवासास परवानगी
Next articleदहावी प्रमाणेच बारावीच्या परीक्षेबाबत तातडीने योग्य निर्णय घ्या : सुप्रिया सुळेंची मागणी