महाराष्ट्रातील मृत्यूंच्या आकडेवारीत लपवाछपवी : दरेकरांचा गंभीर आरोप

मुंबई नगरी टीम

मुंबई । फडणवीसांच्या पत्रावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप रंगले असताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.महाराष्ट्र मॉडेलचे ढोल पिटवले जात आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात दोन वर्षांच्या मुंबईचा मृत्यूदर अहवाल दिला आहे.दोन वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रात २० हजाराच्या आसपास मृत्यूची संख्या वाढली असून १० हजाराच्या आसपास मृत्यूची नोंद दाखवली गेली नाही आहे. त्यामुळे, मृतांचा खरा आकडा दाखवला जात नसल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठविले असून, त्यांना महाराष्ट्रातील स्थितीची आणि त्याचा संपूर्ण देशातील कोरोना लढ्यावर होणारा परिणाम याची जाणीव करून दिली आहे. त्यावर दरेकर म्हणाले की, देशात, मुंबईत सर्वाधिक मृत्यू होत आहे. कोरोनाच्या संकट काळातही सत्ताधारी नेते पुन्हा येथे मुंबई मॉडेल आणि महाराष्ट्र मॉडेल बद्दल कौतुक करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्रात पडद्यामागे अनेक बाबी दडवल्या जात असून खरी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे. त्यामुळे फडणवीस यांनी दिलेल्या पत्रातून सारं चित्र सोनियाजी यांना स्पष्ट होईल, असा दावा दरेकर यांनी केला आहे.

Previous articleम्युकरमायकोसीस रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड,विशेषज्ञांचे पथक नेमण्याच्या सूचना
Next articleपालकमंत्री असावा तर उदय सामंत यांच्या सारखा ! पहाटे ५ वाजता “ऑन फिल्ड”