मुंबई नगरी टीम
मुंबई । महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस व विसंवाद मोठ्या प्रमाणावर आहे.आघाडी करण्यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची महत्वाची भूमिका होती.आता महाविकास आघाडी विस्कळीत होण्याच्या टप्प्यावर आहे,त्यामुळे संजय राऊत भांबावलेले आहेत, अशी टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
संजय राऊत यांच्या भूमिका प्रसंगानुसार बदलतात.ते सध्या अस्वस्थ आहेत.त्यामुळे महाभारताचे दाखले देत आपली भूमिका,आपले अस्तित्व कसे योग्य आहे तसेच भाजप किंबहुना केंद्र सरकार कशा पध्दतीने भूमिका घेत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडुन होताना दिसत आहे, असा टोला दरेकर यांनी लगावला.अनिल देशमुख यांच्या चौकशीबद्दल बोलताना दरेकर म्हणाले की,अशा प्रकारच्या तक्रारी नियमित होत असुन या तक्रारी मंत्र्यांच्या विरोधात किंबहुना प्रस्थापितांच्या विरोधात असल्याने याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते.देशामध्ये संविधानिक हक्क असल्यामुळे देशातील कोणताही नागरिक कोणावरही तक्रार करू शकतो.तपास यंत्रणा किंवा न्यायालयीन व्यवस्था योग्यपरीने आपले काम करीत असते.हे काही भाजप करत नसून समाजातील जो दबलेला आवाज आहे किंवा प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस होते.त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी परमार नावाच्या व्यक्तीने देशमुख आणि राऊत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली असल्याचे दरकेर यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्येयाने पछाडलेलं नेतृत्व असुन लोकं टीका व आरोप करतात.परंतु टीका व आरोप केले जात आहेत म्हणून
पंतप्रधान मोदीजी जनतेला सेवा देण्याचं थांबत नसुन कोरोना संकट काळात स्वतः नियंत्रण करत परिस्थिति हाताळत असतात,प्रत्येक गोष्टीत लक्ष देत जनतेसोबत संवाद साधत होते. आपल्या मंत्र्यांनी सुद्धा लसीकरणाची पाहणी करावी, केंद्रावर जावं,आणि लसीकरण सुरळीत होईल याकडे लक्ष द्यावे.या सर्वांची काळजी घेत पालकतत्वाच्या भूमिकेने पंतप्रधान देशवासियांना पाहत आहे हीच अभिमानाची गोष्ट आहे, असे दरेकर यांनी सांगितले.