दारूची दुकाने पुन्हा सुरू झाल्याने बारमालकाने चक्क कॅबिनेट मंत्र्याच्या फोटोची केली पूजा !

मुंबई नगरी टीम

चंद्रपूर । चंद्रपूर जिल्ह्यात गेली सहा वर्ष असणारी दारुबंदी उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा बार आणि दारूची दुकाने सुरू झाली आहेत.या आनंदाच्या भरात चंद्रपूरातील एका बारमालकाने चक्क मदत व पुनर्वसन मंत्री आणि पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा फोटो लावून आरती केली.याचा व्हिडिओ समाज माध्यमांत चांगलाच व्हायरल झाल्याने ही अनोखी आरती चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

१ एप्रिल २०१५ पासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्रीचे आणि दारू पिण्याचे परवाने रद्द करून संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी लागू केली होती.जिल्ह्यात दारूबंदी लागू केल्यानंतर गेल्या सहा वर्षात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात वाढलेले अवैध दारूचे प्रमाण,वाढती गुन्हेगारी याचा विचार करून मंत्रिमंडळाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील दारूची दुकाने आणि बार सुरू होत आहेत.चंद्रपूर शहरातील एका बार मालकाने सहा वर्षापासून बंद असलेला बार पुन्हा सुरू केला. त्याने आनंदाच्या भरात बार मध्ये दर्शनी भागात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा फोटो लावला आणि उद्घाटनाला चक्क मंत्री वडेट्टीवार यांच्या फोटोची आरती केली.गेल्या सहा वर्षापासून जिल्ह्यात असलेल्या दारुंबदीमुळे आम्ही पूर्ण तोट्यात होतो.दारुबंदी उठवून मंत्री वडेट्टीवर यांनी मोठे उपकार केले अशी भावना या बार मालकाने व्यक्त केली.वडेट्टीवर यांच्या आरतीचा व्हिडिओ समाज माध्यमात चांगलात धुमाकूळ घालत आहे.

Previous articleमोठा निर्णय : अखेर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित
Next articleमला विधानसभेचा अध्यक्ष करा पण शिवसेनेने वनखाते सोडू नये