चिंता नको ! आता १८ वर्षा खालील मुला,मुलींना मॅाल मध्ये प्रवेश मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील शॅापिंग मॅाल सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी मॅालमध्ये केवळ लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत होता.मात्र आता या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून,१८ वर्षा खालील मुला,मुलींना मॅाल मध्ये ओळखपत्राच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे.

राज्यातील सर्व दुकाने आणि शॅापिंग मॅाल रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारने मुभा दिली आहे.मॅाल मध्ये काम करणारे सर्व कर्मचारी,व्यवस्थापन आणि मॅाल मध्ये प्रवेश करणा-या सर्व नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस पूर्ण व दुसरा डोस घेवून,१४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक करण्यात आले होते. या नियमांमुळे अद्याप लसीकरण सुरू न झालेल्या १८ वर्षा खालील मुला,मुलींना याचा मोठा बसताना दिसत होता.त्यामुळे पालक वर्गामध्ये नाराजी होती.मात्र आता या नियमावली मध्ये राज्य सरकारने बदल केला आहे.१८ वर्षा खालील मुला,मुलींचे लसीकरण अद्याप सुरू झाले नसल्याने त्यांना ओळखपत्रांच्या आधारावर मॅाल मध्ये प्रवेश दिला जाणार आहे.त्यासाठी आधारकार्ड,पॅनकार्ड, किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे.

Previous articleराज ठाकरे यांच्या आरोपातील शरद पवार यांनी काढली हवा,काय म्हणाले पवार ?
Next articleअजितदादांचा मोठा निर्णय : पूरबाधित व्यापारी,टपरीधारकांना ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज देणार