प्रबोधनकारांचे लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं हे चालणार नाही

मुंबई नगरी टीम

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीवाद वाढला असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता.त्यावर राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचण्याचा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला असता आता पवार यांच्या या वक्तव्याचा समाचार राज ठाकरे यांनी घेतला आहे.

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.मी सर्वांची पुस्तके वाचली आहेत.प्रबोधनकरांचे संदर्भ त्या त्या काळातले होते.माझ्या आजोबांचे लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असे चालणार नाही.मी यशवंतराव चव्हाण हेही वाचले आहे,त्यांचेही मत काय होते हेही मला माहिती आहे, अशा शब्दात त्यांनी पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.आज ही आपण जातीपातीच्या राजकारणात खितपत पडलो आहोत.देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षाचा काळ उलटला तरी निवडणुकीच्या भाषणात रस्ते,पाणी आणि वीज यांचीच आश्वासने दिली जातात.त्यामुळे एवढ्या वर्षात आपण काय केले हे शोधले पाहिजे.१९९९ साला पूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच मात्र १९९९ नंतर जातीवाद वाढला.राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीवाद वाढला असे मी म्हणालो होतो.प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान होता.पण राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर अन्य जातींबद्दल द्वेष निर्माण झाला असे मी एकटाच बोललो.त्यावर मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला असेही राज ठाकरे म्हणाले.

माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला शरद पवार यांनी समजावून सांगावे असे सांगतानाच,एका चॅनलला दिलेल्या मुलाखत आपण गेल्या ७५ वर्षांमध्ये काय कमावलं आणि गमावलं हे स्पष्ट केले होते.जो पर्यंत आपण वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या,तरी आपली प्रगती होणार नाही या अनुषंगाने माझी भूमिका होती असे त्यांनी स्पष्ट केले.आता तर जातीचं वातावरण तयार करण्यात येत आहे.मी शरद पवार यांची मुलाखत घेतल्यावर राज ठाकरे यांची भूमिका बदलली असा अर्थ पत्रकारांनी काढला पण त्याचा काय संबंध असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला.वाढदिवशी मी चांगलं बोलतो.मग म्हणजे काय भूमिका बदलली का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.राज ठाकरे यांनी यावेळी बाबासाहेब पुरंदरेंचा मुद्दाही उपस्थित केला.पुरंदरेंना मी इतिहास संशोधक म्हणून पाहतो, ब्राह्मण म्हणून नाही असेही ते म्हणाले.शरद पवार यांच्याकडे मी मराठा म्हणून जात नाही. कुणाच्याही घरी आपण जात म्हणून जातो का ? असा सवालही त्यांनी उपस्थित करीत बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणता, मग सिद्ध करा असे आव्हानही राज ठाकरे यांनी दिले.५० साली जेव्हा पहिले पुस्तक आले त्यावेळी तुम्हाला चुकीचा इतिहास कळला नाही का ? ज्याचे काही आकलन नाही, त्याच्यावर काय बोलायचे ? कोण जेम्स लेन, तो सध्या कुठे आहे ? आग लावायला आला,त्याच वेळी का आला ? हे सर्व चांगले रंगवलेले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Previous articleदोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा लढवलेल्या आशा बुचकेंचा भाजपात प्रवेश
Next articleतहसिलदाराची आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप;फडणवीसांचे न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र