श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना ‘राम नाम सत्य है’ बोलायला लावू नका

मुंबई नगरी टीम
मुंबई । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे झालेल्या जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याचा राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.महाराष्ट्र पेटेल असे काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती त्यांनी केली.श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना ‘राम नाम सत्य है’ बोलायला लावू नका असा इशाराही त्यांनी वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारला दिला.
राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा जनता दरबार राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पार पडला.त्यावेळी माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले.महाराष्ट्र शांत आहे,कुठेही क्लेश नाही,द्वेष दिसत नाही,सर्व समाज एकत्र वावरताना दिसत आहेत असेही आव्हाड म्हणाले.कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय,त्यांच्या खिशात पैसे नाही,गॅस महाग झालाय,पेट्रोल – डिझेल महागलंय,भाज्या,केरोसिन महाग झालंय,खाण्यापिण्याच्या वस्तूपासून सर्वच महाग झालंय याबाबत काही बोलत नाहीत. मात्र जे गरजेचं नाही ते विषय बनवले जात असून मुख्य विषयापासून दुसरीकडे लक्ष नेण्याचे काम सुरू आहे असा आरोपही आव्हाड यांनी केला.गॅसबद्दल,पेट्रोल,डिझेल,महागाई याबद्दल बोला ना,ही महागाई गरीबांना किती खाते आहे याबद्दल बोला,श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना ‘राम नाम सत्य है’ बोलायला लावू नका असा स्पष्ट इशाराही आव्हाड यांनी दिला.

Previous articleमहाविकास आघाडी सरकारला गरिबांची नाही, तर बेवड्यांची चिंता अधिक
Next articleकोल्हापुरात पराभव दिसत असल्याने चंद्रकांत पाटलांची मतदारांनाच ईडीची धमकी