आज पण राणेंमुळे शिवसेनेत पदं मिळतात;नितेश राणेंनी पुन्हा सेनेला डिवचलं

मुंबई नगरी टीम

मुंबई । केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राणे यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन करणा-या मोहसीन शेख युवासेनेच्या कार्यकर्त्याची युवासेना सहसचिवपदी नेमणूक केल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचले आहे.

केंद्रीयमंत्री राणे यांच्या वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले होते.राणे यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात युवासेनेचा कार्यकर्ता मोहसीन शेख याला पोलीसांनी प्रसाद दिला होता.मात्र राणे यांच्या बंगल्यासमोर युवासेनेची ताकद दाखवून देणाऱ्या या कार्यकर्त्याची मंत्री आदित्य ठाकरे यांनी सहसचिवपदी मोहसीन शेख नियुक्ती करून बक्षिस दिले आहे.मोहसीन शेख सध्या रूग्णालयात उपचार घेत आहे.तर दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करीत सेनेची खिल्ली उडवली आहे.” राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणा-या ” त्या ” युवासेना कार्यकर्त्याची बढती” …आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात !! …सिर्फ नाम हि काफी है ! अशा शब्दात राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

कोण आहेत मोहसीन शेख ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे मोहसीन शेख यांनी २०१७ ला राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.शिवसेनेत प्रवेश करताच पक्ष कार्याला सुरूवात करून अनेकांचे लक्ष वेधून घेतले.राणेच्या बंगल्या समोर आंदोलन करण्यात ते अग्रेसर होते.त्यामुळे त्यांनी आपल्या नेत्याची मने जिंकून घेतली.

Previous articleओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेवू नका
Next articleराज्यातील “या” चार जिल्हा बँकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या