राष्ट्रीय महामार्गाला भेगा ; पंकजा मुंडेंच्या ट्वीटनंतर नितीन गडकरींकडून कारवाईचे निर्देश

मुंबई नगरी टीम

मुंबई । पैठण – पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ७५२ या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे ट्वीट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी फोटोसह केल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामासंदर्भात एक ट्वीट केलं असून त्यात म्हटलं आहे की, पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ७५२ ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच. त्यांनाही हे अजिबात चालणार नाही. तात्काळ दखल घेतली जाईल. सोबतच पंकजा मुंडे यांनी एक फोटो देखील पोस्ट केला आहे.या ट्वीटला लगेच नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून उत्तर देण्यात आलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व खराब झालेले रस्त्यांची कामं देखील लवकरात लवकर केली जातील, असं गडकरी यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Previous articleखूशखबर : आता दिल्लीच्या धर्तीवर राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणार शिक्षण
Next articleराज्यसभा पोटनिवडणूक : काँग्रेसच्या रजनी पाटील विरूद्ध भाजपचे संजय उपाध्याय यांच्यात सामना रंगणार