जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत मविआची बाजी ; मविआला ४६ तर भाजपला २२ जागा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये काल ५ ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी झाली असून,नागपूर, पालघर, धुळे,नंदूरबार,अकोला आणि वाशिमच्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात महाविकास आघाडीला ४६ जागांवर विजय मिळाला आहे तर भाजपला २२ जागा जिंकण्यात यश आले आहे.एका जागेवर सीपीआयला विजय मिळाला आहे.

ओबीसी राजकीय आरक्षणा शिवाय झालेल्या नागपूर,पालघर, धुळे,नंदूरबार,अकोला आणि वाशिमच्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार एकूण ८५ जागां पैकी महाविकास आघाडीला एकूण ४६ जागांवर विजय प्राप्त करता आला आहे.भाजपला एकूण २२ जागांवर विजय मिळवता आला आहे.पालघर मध्ये सीपीआयला १ जागेवर विजय मिळाला आहे.६ जिल्हा परिषदेमधिल एकूण ८५ जागांपैकी पालघर मध्ये भाजपला ४,काँग्रेसला २,राष्ट्रवादीला ३,शिवसेनेला २ तर सीपीएमला १ जागा मिळाली आहे.धुळे जिल्हा परिषदेत भाजपाला ८,काँग्रेसला २,राष्ट्रवादीला ३ शिवसेनेला २ जागा मिळाल्या आहेत.नंदुरबार मध्ये भाजपला ४,काँग्रेसला ३, राष्ट्रवादीला १ तर शिवसेनेला ३ जागा मिळाल्या आहेत.अकोला जिल्हा परिषदेत भाजपला १,काँग्रेसला १,राष्ट्रवादीला २,शिवसेनेला १ तर वंचित ७ आणि अपक्षांना १ जागेवर विजय मिळाला आहे.वाशिम जिल्हा परिषदेत भाजपला २,काँग्रेसला ४,राष्ट्रवादीला ३ शिवसेनेला १,आघाडीला ३ तर अपक्षांना १ जागा मिळाली आहे. नागपूर मध्ये भाजपला ३, काँग्रेसला ९,राष्ट्रवादीला २,आघाडीला २ जागा मिळाल्या आहेत.एकूण ८५ जागांपैकी भाजपला २२,काँग्रेसला १९,राष्ट्रवादीला १५ तर शिवसेनेला १२ जागा मिळाल्या आहेत.विविध आघाडीला १२ अपक्षांना ४ जागा मिळाल्या आहेत.पालघर मध्ये सीपीएमला १ जागा मिळाली आहे.

Previous articleमंत्रिमंडळ बैठक : ठाकरे सरकारने घेतले महत्वाचे ७ निर्णय
Next articleधाडी पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया ! काय म्हणाले पवार ?