अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ऐनवेळी हा विषय चर्चेला आला असता मंत्रिमंडळाने त्याला एकमताने मंजूरी दिली.या निर्णयाची अमंलबजावणी करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभाग लवकरच ही मदत कशा पद्धतीने देणार आहे.याविषयी शासन निर्णय जारी करणार आहे.राज्यात जून महिन्यांपासून अवकाळी पावसाने लाखो शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले.अजूनही राज्यात पाऊस पडत आहे.याबाबत हवामान खात्याने वेळोवेळी अंदाज वर्तवला आहे.राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर. ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.मदत व पुनर्वसन विभाग पुढील काही दिवसांत ही मदत कशी द्यायची.याविषयी निर्णय घेणार असून त्या मदतीचे वाटप करणार आहे

Previous articleमावळच्या घटनेला त्यावेळचे सरकार नाही तर भाजपचे स्थानिक कार्यकर्ते जबाबदार
Next articleराज्यातील महाविद्यालये येत्या २० ऑक्टोबरपासून सुरु होणार