मावळच्या घटनेला त्यावेळचे सरकार नाही तर भाजपचे स्थानिक कार्यकर्ते जबाबदार

मुंबई नगरी टीम

मुंबई । केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा सतत गैरवापर होत असल्याची टीका करतानाच मावळ मध्ये घडलेल्या घटनेत शेतकरी मृत्यूमुखी पडले त्याला जबाबदार राजकीय पक्ष किंवा नेते नव्हते.याचे आरोप पोलिसांवर करण्यात आले होते.घटनेला सरकार जबाबदार नव्हते तर स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिले होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपुर घटनेची तुलना जालियनवाला बागेशी केली होती. लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद केला होता त्यावेळी विरोधी पक्षनेते यांनी मावळच्या घटनेवरून राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले होते.फडणवीस यांच्या या टीकेचा समाचार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज घेतला.मावळच्या घटनेत शेतकरी मृत्यूमुखी पडले त्याला जबाबदार राजकीय पक्ष किंवा नेते नव्हते असे सांगतानात या घटनेचे आरोप पोलिसांवर करण्यात आले होते.या घटनेला सरकार जबाबदार नव्हते तर स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले असे पवार म्हणाले.मावळच्या घटनेला सरकार जबाबदार नसल्याचे लोकांना कळले. त्यामुळेच मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार ९० हजार मतांनी निवडून आले असेही पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केंद्रीय तपास यंत्रणेलाही लक्ष्य केले. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा सातत्याने गैर वापर करत असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला.केंदारकडून सीबीआय,ईडी, एनसीबी या संस्थांचा वापर केला जात असल्याचे पवार म्हणाले.माजी गृहमंत्री देशमुख यांच्याबाबत माजी पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले होते त्यामुळे देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.ज्यांनी आरोप केले ते आता कुठे आहेत असा सवाल यांनी करून ईडी, सीबीआयच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही पवार म्हणाले.एक जबाबदार अधिकारी देशमुख यांच्यावर करतो हे लक्षात आल्यानंतर तात्काळ राजीनामा दिला मात्र आरोप करणाराच व्यक्ती मात्र गायब झाला आहे. हा फरक सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. देशमुखांची याबाबत चौकशी सुरू आहे. त्यांच्या घरी ५ वेळा छापे मारी करण्यात आली.त्यामध्ये त्यांना नेमकं काय मिळाले हे समजले नाही.याबाबत जनतेने विचार करायला हवा,असे पवार यावेळी म्हणाले.

लखीमपुरची घटना माध्यमांमुळे पुढे आली यात एक पत्रकाराची हत्या झाली.असा प्रकार यापूर्वी कधी घटला नाही.या घटनेत केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचे चिरंजीव असल्याची बाब समोर आली.यात ते नव्हते असे त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाने यावर भाष्य केल्यावर त्यांना अटक करण्यात असली तरी या घटनेची जबाबदारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना टाळता येणार नाही त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीमाना द्यायला हवा असेही पवार म्हणाले.यावेळी पवार यांनी आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची खिल्ली उडवली.पाच वर्ष सत्तेत असल्याचे स्मरण राहणे हे कधीही चांगले.वेदना किती खोल आहे हे यातून दिसते,अशी खोचक टीकाही पवार यांनी केली.पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचे स्मरण ठेवणे ही चांगली गोष्ट आहे मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिले नाही. सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येते. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असेही पवार म्हणाले.

Previous articleराज्यातील सिनेमागृहे ५० टक्के आसनक्षमतेने सुरु होणार ; मार्गदर्शक सूचना जारी
Next articleअतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य