नवाब मलिक पुन्हा गरजले : आता नावं घ्यायला सुरुवात केलीय, इतकं का घाबरताय ?

मुंबई नगरी टीम

गोंदिया । सोशल मिडियावर लाल कपडे टाकून नवाब मलिक घाबरतील… आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

गोंदिया जिल्हयाच्या दौ-यावर असताना माध्यमांनी विचारले असता नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला.या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे.माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे.ज्यांच्या बेनामी संपत्ती आहेत.सोशल मिडियावर लाल गाठोड दाखवत आहेत असे चोर लोक माझ्याकडे बोट दाखवत असल्याचा आरोप मलिक यांनी नाव न घेता केला.मी भंगारवाला आहे… अशा रद्दी माझ्याकडे दहा – वीस आणि शंभर टन आहेत. आम्ही चोर नाही… आम्ही डाकूकडून सोनं घेतलं नाही… बँका बुडवल्या नाहीत… त्या वानखेडेशी कुणाचा काय संबंध आहे… कुठल्या हॉटेलचे कोण मालक आहे… त्या हॉटेलमधील वस्तू क्रुझवर कशा गेल्या… क्रुझवरील कॅटरिंग मध्ये ड्रग्ज कसे गेले… आता नावं घ्यायला सुरुवात केलेली आहे… इतकं का घाबरताय असा सवालही मलिक यांनी केला आहे.

Previous articleधनंजय मुंडेंचा निर्णयाचा धडाका : बौद्धवस्त्यांच्या सर्वांगीण सुधारणेसाठी घेतला मोठा निर्णय
Next articleदहावी,बारावीच्या परीक्षांसाठी १७ नंबरचा फॉर्म भरणा-या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय