मलिकांच्या पैहचान कौनला राणेंचे प्रत्युत्तर ! मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात

मुंबई नगरी टीम

मुंबई । हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना म्यॉव म्यॉव असा आवाज काढत डिवचले होते.त्यानंतर आज राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज ट्विट करीत एका फोटोद्वारे राणे यांना उत्तर दिले असतानाच माजी खासदार निलेश राणे यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर परीकर यांचा फोटो ट्विट करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच थेट निशाणा साधला.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना म्यॉव म्यॉव असा आवाज काढत डिवचल्यावर राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री मलिक यांनी आज राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.मलिक यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी कोंबडीचा फोटो ट्वीट केला आहे. या शरीर कोंबडीचे आणि तोंड मांजरीचे दर्शवले आहे. हा फोटो ट्वीट करताना मलिक यांनी पैहचान कौन ? असा खोचक सवालही मलिक यांनी केला आहे.मलिकांचे हे ट्विट व्हायरल होताच माजी खासदार निलेश राणे यांनीही मलिकांना उत्तर देत गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर परीकर यांचा आजारपणातील फोटो ट्विट केला आहे.गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर परीकर मुख्यमंत्री असताना त्यांचे निधन झाले. पण १ दिवस सुद्धा घरी बसले नाही. कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी झुंजत असताना त्यांनी कधी कामामध्ये तडजोड केली नाही, शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात असा टोलाही त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे.

Previous articleसंपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाची चपराक,बडतर्फीला स्थगिती देण्यास नकार
Next articleराज्यात रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी, लग्न समारंभ, उपहारगृहासाठी नवे नियम