मुंबई नगरी टीम
मुंबई । क्रूझ ड्रग्ज प्रकरणात दररोज पुराव्यासह पोलखोल करणारे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी आज एक ट्विट करीत एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांना पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांची बहिण हर्षदा दिनानाथ रेडकर यांच्यावर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे आणि समीर वानखेडे यांनी या प्रकरणी उत्तर द्यावे,असे मलिक यांनी ट्विट मध्ये म्हटले असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Sameer Dawood Wankhede, is your sister-in-law Harshada Dinanath Redkar involved in the drug business ?
You must answer because her case is pending before the Pune court.
Here is the proof pic.twitter.com/FAiTys156F— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 8, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक काल पत्रकार परिषद घेवून क्रूझ ड्रग्ज प्रकरणी पुराव्यासह अनेक खळबळजनक दावे केले.त्यानंतर आज मलिक यांनी ट्विट करीत क्रांती रेडकर यांची बहिण आणि समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर यांच्यासंदर्भात ट्विट करीत समीर वानखेडे यांना काही प्रश्न विचारले आहेत.क्रांती रेडकर यांच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचे प्रकरण प्रलंबित असून,समीर वानखेडे यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.आता या प्रकरणावर समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यावर या खुलासा करतात याकडे लक्ष लागले आहे.मलिक यांनी आज केलेल्या ट्वीटमध्ये काही स्क्रिनशॉट्सही सादर केले आहेत.मलिक यांनी आज केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की,समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय ? तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल, कारण तिच्या विरोधातली केस पुणे न्यायालयात प्रलंबित आहे.क्रूझ ड्रग्ज प्रकरणी पुराव्यासह आरोप करणारे मलिक यांनी आज नविन आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे.