‘या’ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी २१ डिसेंबरला निवडणूक

मुंबई नगरी टीम

मुंबई । भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा; तसेच त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान आणि २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे,असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि त्यांतर्गतच्या ७ पंचायत समित्यांच्या १०४; तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ आणि त्यांतर्गतच्या ८ पंचायत समित्यांच्या १०६ जागांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे १ ते ६ डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. ५ डिसेंबर रोजी सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. ७ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. मतदान २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या जि. प. आणि पं. स. ची नावे: भंडारा जिल्हा परिषद- त्यांतर्गतच्या पंचायत समित्या- तुमसर, मोहाडी, भंडारा, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखांदूर. गोंदिया जिल्हा परिषद- त्यांतर्गतच्या पंचायत समित्या- गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, सडकअर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी.

Previous articleराणेंनी मार्च ही जास्तच मुदत दिली …..जयंत पाटलांचा नारायण राणेंना टोला !
Next articleराज्यातील २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर