मग भाजपने बोलावं का नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला ; अजित पवारांनी सुनावले

मुंबई नगरी टीम

मुंबई । भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील संबंध ताणले गेले आहे.गोंदियामध्ये राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका त्यांनी केली होती.पटोलेंच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.नाना पटोले यांचे वक्तव्य चुकीचे असून, ते कुठुन आले आहेत ते सर्वांना माहीत आहे.त्यामुळे भाजपने बोलावं का नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला असा टोला त्यांनी पटोलेंना लगावला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत गोंदियामध्ये राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता.राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका त्यांनी केली आहे.त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.नाना पटोले यांचे वक्तव्य चुकीचे आहे.ते कुठुन आले आहेत ते सर्वांना माहीत आहे.त्यामुळे भाजपने बोलावे का नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला.हेडलाईन बनण्यासाठी ते बोलले असावेत असे सांगून, जबाबदार नेत्याने वक्तव्य करताना वेडेवाकडे परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असेही पवार यांनी सुनावले.राष्ट्रवादीचे काही पदाधिका-यांना त्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला आहे. १५ वर्षे कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोघांनी सरकार चालवले आहे.त्यावेळी कार्यकर्ते घेत होतो.इतर पक्षात जाऊन त्यांची ताकद वाढण्यापेक्षा एकमेकांच्या पक्षात राहतील हे पाहिले पाहिजे.आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवार खुपसत नाही आणि असे कधीही बोलत नाही असेही पवार म्हणाले.

Previous articleसंजय राऊत यांनी देशाची नव्हे, महाराष्ट्राची काळजी करावी; प्रविण दरेकरांचा टोला
Next articleजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात १० हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू