मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधीत १३० कोटी जमा, खर्च केवळ ३१ कोटी रूपये

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधी ही प्रामुख्याने वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान जनतेला अर्थसहाय्य करण्यासाठी वापरली जाते पण आजमितीस एकूण जमा १३० कोटी पैकी फक्त ३१ कोटी खर्च करण्यात आली असून ९९ कोटी रक्कम शिल्लक असल्याची आल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत जमा रक्कम,खर्च करण्यात आलेली रक्कम आणि शिल्लक रक्कमेची माहिती विचारली होती.मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहाय्यता निधी कक्षाने अनिल गलगली यांस कळविले की मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पासून आजमितीस १३० कोटी रुपये रक्कम जमा झालेली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ( मुख्य निधी) नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना ९ कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. वैद्यकीय कारणांसाठी ४९३२ नागरिकांना २२ कोटींचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ( मुख्य निधी) दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीसाठी मिळून ९९ कोटी रुपये शिल्लक आहे. दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ पासून ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ प्रकरणात अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे.

Previous articleमोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत
Next articleसोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार