मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.पायाभूत सुविधांची कामे वेगाने होण्यासाठी आता दिवसाप्रमाणे रात्री देखील गौण खनिजांचे उत्खनन, वाहतूक करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले आहेत.त्याची थोडक्यात माहिती

१) छाबय्या विहंग गार्डन या इमारतीस लावलेला दंड व त्या दंडावरील संपूर्ण व्याज माफ करून भोगवटा प्रमाणपत्र देण्यास मान्यता
२ ) पायाभूत सुविधांची कामे वेगाने होण्यासाठी आता दिवसाप्रमाणे रात्री देखील गौण खनिजांचे उत्खनन, वाहतूक करण्यास मान्यता
३ ) गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या व मृतभाटकाच्या दरात सुधारणा
४ ) मौजे आंबिवली येथील जमीन “शांताबाई केरकर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टला “मॅटर्निटी होम व डिस्पेन्सरी” साठी भुईभाडयाने प्रदान करण्यास मान्यता.
५ ) महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान ३ टक्के इतका निधी कायमस्वरुपी उपलब्ध करून देणार.
६ ) कोविड- १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर वार्षिक कर भरणा-या स्कूल बसेसना वाहन करातून १०० टक्के सूट देण्याचा निर्णय.
७ ) दहा कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे बंधनकारक
८ ) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. मुंबई महामंडळाकडून राष्ट्रीय मागासवर्गीय वित्तीय विकास महामंडळ, दिल्ली यांची थकित वसुली ८८.२४ कोटी रक्कम भरणा करण्यास मान्यता.
९ ) बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे मनोविकृतीशास्त्र, बालरोगचिकित्साशास्त्र तसेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी ९ अध्यापकीय पदांची निर्मिती.
१० ) बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील ४६.४५ चौ.मी. (५०० चौ.फूट) अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या “निवासी” हा वापरकर्ता प्रवर्ग असलेल्या मालमत्तांना मालमत्ता करामधून सवलत.

Previous articleमंत्रिमंडळाचा निर्णय : सर्वच दुकानांच्या पाट्या मराठीत लावणे बंधनकारक
Next articleवाहतूकदारांना दिलासा : स्कूल बसेसना १०० टक्के कर माफ करण्याचा निर्णय